शाळेला सुट्टया म्हटले की विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. शाळेला कधी एकदाच्या सुट्टया लागतील आणि कधी आम्ही अभ्यासातून मोकळे याच विचारात विद्यार्थी असतात. आता विद्यार्थ्यांच्या मनासारखी बातमी समोर आली आहे कारण विद्यार्थ्यांच्या शाळेच्या सुट्ट्यांची तारीख जाहीर झाली आहे.
राज्यातील शाळांना 21 एप्रिल पासून सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. लवकरच शिक्षण विभागाकडून याची घोषणा केली जाईल. अनेक विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून उन्हाळ्याच्या सुट्यांची वाट पाहत असतात. 21 एप्रिल पासून शाळांना सुट्टया जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जाणार का?
अनेक शाळा सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना घरी करण्यासाठी अभ्यास देत असतात. शाळेत केलेला अभ्यास विद्यार्थी विसरू नये आणि सुट्यांमध्ये घरी जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून हा अभ्यास दिला जातो. या वर्षी सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास द्यायचा की नाही याचा निर्णय शाळांवर असणार आहे.
सुट्यांमध्ये दिलेल्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना फायदा होतो का?
सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या सरावासाठी शिक्षकांकडून जो अभ्यास दिला जातो त्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होतो. कारण सुट्ट्यांमध्ये बरेचसे विद्यार्थी अभ्यास विसरून जातात असे शिक्षकांचे म्हणणे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी मध्ये अभ्यास दिला पाहिजे अशी मागणी आता शाळांमधील शिक्षक करीत आहेत.
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.