दुःखी-कष्टी लोकांचे दुःख समजून घेणे हाच खरा धर्म आहे.
दृढनिश्चय व एकजुटीची कृती यांनाच कर्मभूमीत यश मिळते.
आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
महत्वकांक्षा नसणाऱ्या मनुष्याला मोठेपण प्राप्त होत नाही.
आई आणि मातृभूमी यांचे श्रेष्ठत्व हे स्वर्गा होऊनही अधिक आहे.
उद्योग व खेळ यांचे मिश्रण झाले की तुम्ही समर्थ व सुखी व्हाल.
आईने पाठीवरून प्रेमळ पणाने हात फिरवून केलेले उपदेश साऱ्या ग्रंथातील ज्ञानापेक्षा पवित्र.
कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन.
शत्रुने केलेली स्तुती म्हणजेच सर्वोत्तम कीर्ती होय.
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उद्धारी.
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.