गुरू आणि शिष्य (बोधकथा – 4)

विद्यार्थ्यांनो गुरू आणि शिष्याचे नाते आपल्या सर्वांना माहितीच आहे गुरु विना शिष्य अपूर्ण आहे आणि शिष्यविना गुरू अपूर्ण आहे. जीवनात पुढे जायचे असेल आणि आपली ध्येय प्राप्त करायचे असेल तर आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाला आपल्या गुरूंची साथ आवश्यक असते. आपल्या ध्येयापर्यंत गुरु आपल्या सोबत येत नाहीत परंतु त्या ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे याचे मार्गदर्शन गुरु आपल्याला करतात.

ही कथा अशीच एका गुरू आणि शिष्याची आहे ज्यात गुरूंच्या मार्गदर्शनामुळे एक असा विद्यार्थी ज्याच्यासमोर काहीच ध्येय नव्हते, कुणाचेही मार्गदर्शन नव्हते तो विद्यार्थी आपल्या ध्येयापर्यंत कसा पोहोचला हे देण्यात आले आहे. ही बोधकथा फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालकांसाठीही प्रेरणादायी आहे. 

एका डोंगरी नावाच्या गावात राजू नावाचा मुलगा राहत होता. राजू आपल्या गावातील शाळेतच शिक्षण घेत होता परंतु शिकण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि अभ्यासात येत होत असा हुशार नव्हता कारण त्याला अभ्यासाचा खूप जास्त कंटाळा येत असेल. राजू खूपच काळजी होता शाळेमध्ये शिक्षकांनी दिलेला अभ्यास तो कधी पूर्ण करायचा नाही तसेच कोणत्याही शिक्षकांसोबत तो व्यवस्थित बोलत नसायचा. तो कोणत्याही शिक्षकांचा आदर करत नसायचा शिक्षकांना उलट उत्तरे द्यायचा.

त्याच्या या वागण्याचा सर्व शिक्षकांना खूप राग यायचा त्यामुळे सर्व शिक्षक राजू कडे दुर्लक्ष करायला लागले होते. राजूच्या अशा वागण्याने राजूचे आई-वडील ही खूप जास्त चिंतेत होते आपल्या राजुचे पुढे कसे होईल या काळजीत ते नेहमी असायचे. त्याच्या अशा वागण्यामुळे आणि गावातील शिक्षकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे राजूच्या आई-वडिलांनी राजूला शहरातील शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला.

शहरातील शाळेत राजूचा प्रवेश घेण्यात आला परंतु शहरातील शाळेत आल्यामुळे राजूचा स्वभाव आणखी चिडचिडा झाला तो आणखी खोडकरपणा करायला लागला आणि शिक्षकांना त्रास द्यायला लागला. त्याच शाळेत मिलिंद सर नावाचे एक शिक्षक होते. त्यांनी राजूच्या या गोष्टी बारकाईने हेरल्या होत्या. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती राजुने जर खोडकरपणा केला आणि त्यासाठी शिक्षकांनी जर त्याला मार दिला तर तो आणखी जास्त खोड्या काढायचा आणि शिक्षकांना त्रास द्यायचा. मिलिंद सरांनी सर्व शिक्षकांशी चर्चा करून राजूला कोणत्याही चुकीसाठी न मारण्याची विनंती केली.

मिलिंद सरांनी राजूला एक दिवस आपल्याजवळ बोलावून घेतले आणि विचारले राजू तू एक हुशार आणि गुणी मुलगा आहेस मग असे का वागतोस ? काही समस्या असेल तर मला सांग मी तुझी मदत करेल. राजू काहीही न बोलता तेथून पळून गेला. त्यानंतर राजुने जेव्हा जेव्हा खोड्या केला तेव्हा तेव्हा कुठल्याही शिक्षकाने त्याला मारले नाही. मिलिंद सरांचे बोलणे राजूच्या डोक्यात सारखे घोळत होते कारण राजूला आजपर्यंत कोणीही हुशार म्हटले नव्हते गुणी म्हटले नव्हते आणि खोड्या केल्यानंतरही शिक्षकांनी न मारणे हे त्याच्यासाठी सर्व नवीन होते. कारण आतापर्यंत खोड्या करण्यासाठी त्याला फक्त शिक्षकांचा मार मिळाला होता.

मी हुशार नाही मला काही येत नाही तरीही मिलिंद सर मला हुशार का म्हणाले ? या विचाराने राजू अस्वस्थ झाला होता तो तसाच पळत पुन्हा मिलिंद सरांकडे गेला आणि त्याने मिलिंद सरांना विचारले सर मी हुशार नाही मला काही येत नाही तरीही तुम्ही मला हुशार का म्हणाले ? मिलिंद सर म्हणाले कोण म्हणाले तू हुशार नाहीस ? राजू म्हणाला सर्वच म्हणतात माझ्या वर्गातील विद्यार्थी म्हणतात तू हुशार नाहीस, इतर सर्व शिक्षक म्हणतात तुला काही येत नाही, मलाही वाटते मला खरंच काही येत नाही अभ्यासाचा मला जाम कंटाळा येतो सर… मी काय करू ?

मिलिंद सरांनी त्याच्या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर दिले प्रयत्न…  तू फक्त प्रयत्न कर ज्या ज्या गोष्टी तुला मिळवायच्या आहेत त्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी तू प्रयत्न कर आणि बघ तू तुझ्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचशिल. राजू म्हणाला सर पण माझे कुठलेही ध्येय नाही सर म्हणाले मग सर्वात अगोदर तू तुझे ध्येय निश्चित कर. सरांच्या या बोलल्याने राजू रात्रभर झोपला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून राजू शाळेत गेला त्याला मिलिंद सर दिसले आणि तो धावतच त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला सर माझे ध्येय निश्चित झाले आहे सरांनी विचारले मग काय ध्येय निश्चित केले तर… राजू म्हणाला सर मी मोठा होऊन डॉक्टर होणार सर म्हणाले डॉक्टर होण्यासाठी तू काय करणार ? राजू म्हणाला सर मी प्रयत्न करणार…

राजुने त्याच दिवसापासून अभ्यास करायला सुरुवात केली आणि तो प्रत्येक विषयामध्ये पारंगत होत गेला पुढे जाता जाता त्याने इतर विद्यार्थ्यांना कधी मागे टाकले हे त्यालाही कळले नाही. आणि राजू पुढे जाऊन खूप मोठा डॉक्टर झाला.

एक दिवस राजूच्या हॉस्पिटलमध्ये एक खूप गंभीर पेशंट आले ते पेशंट खूप घाबरलेले होते. त्या पेशंटला डॉक्टरांकडून ऑपरेशन करून घ्यायचे नव्हते कारण कुठल्याही डॉक्टरांवर त्या पेशंटला विश्वास नव्हता. राजू जेव्हा आला तेव्हा त्याने पाहिले समोरचे पेशंट दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते मिलिंद सर होते राजुने मिलिंद सरांना सांगितले सर तुम्ही अजिबात घाबरू नका. मी राजू आहे तुमचा विद्यार्थी ओळखले का मला ? राजूला पाहून मिलिंद सर शांत खाली पडले आणि ऑपरेशन करायला तयार झाले. सर म्हणाले राजू राजू माझा तुझ्यावर तेव्हाही विश्वास होता आणि माझा तुझ्यावर आजही विश्वास आहे मला वाचवशील ना… ?

राजूला माहिती होते सरांना शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आहे आणि यातून ते वाचू शकणार नाहीत राजू सरांपासून बाजूला गेला आणि ढसाढसा रडू लागला तो स्वतःशीच बोलू लागला हा खोडकर राजू मिलिंद सरांमुळे डॉक्टर होऊ शकला आणि आज तेच सर जीव वाचविण्याची विनंती करत आहे परंतु तो काहीच करू शकत नाही…

तो पुन्हा सरांजवळ आला सरांचा हात पकडला आणि सरांजवळ बसला आणि सरांना सांगू लागला सर आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे परंतु मला माफ करा आज मी तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही. सरांनी राजू कडे पाहिले आणि म्हणाले राजू नाही म्हणू नकोस एक गोष्ट तू नक्की करू शकतो. राजुने विचारले कोणती गोष्ट सर ? सर म्हणाले प्रयत्न… आणि एवढे बोलून सरांची प्राणज्योत मावळली.

तात्पर्य : आपल्या जीवनात काही गुरु असे असतात की फक्त त्यांच्या बोलण्याने एखाद्या विद्यार्थ्याचे आयुष्य पालटून जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा मुलांना समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले तर नक्कीच विद्यार्थी एक आदर्श व्यक्ती बनतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group