छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळ यावर आधारित काही जनरल नॉलेजचे प्रश्न देत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असावेत असे काही प्रश्न आणि उत्तरे खाली दिलेले आहेत हे प्रश्न उत्तरे विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहून ठेवायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत.
1) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान (पेशवा) कोण होते ?
– मोरो त्रिंबक पिंगळे.
2) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मंत्री (वाकनीस) कोण होते ?
– दत्ताजीपंत त्रिंबक.
3) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुजुमदार कोण होते ?
– रामचंद्र नीलकंठ.
4) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव कोण होते ?
– अण्णाजी दत्तो.
5) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ?
– हंबीरराव मोहिते.
6) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात परराष्ट्रमंत्री (डबीर) कोण होते ?
– रामचंद्र त्रिंबक.
7) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश कोण होते ?
– निराजी रावजी.
8) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात पंडित (महंत) कोण होते ?
– रघुनाथराव पंडित.
Jay shivaji
I an going to school