विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाचे सुविचार देत आहोत. या सुविचारंनी नक्कीच सर्वांना प्रेरणा मिळेल.
1) दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती.
2) लीन असावे परंतु दीन असू नये.
3) शरीर हे परमेश्वराचे मंदिर असून ते सुंदर, स्वच्छ व पवित्र ठेवणे म्हणजेच परमेश्वराची पूजा करण्यासारखेच आहे.
4) मनाचा खोटेपणा हा अनेक दुःखांचे मूळ असू शकतो.
5) ज्ञानात शाप देखील वरदान होऊन जातो, तर अज्ञानात वरदान देखील शापा सारखेच वाटतात.
6) जो स्वतःला जाणतो तोच ज्ञानी असतो.
7) नुसते भराभर वाचत जाणारे ज्ञान हे फलहीन वृक्षप्रमाणे असते.
8) ज्ञान तिथे मान मिळतो.
9) काळ हा अखंड असून सर्वांचा न्यायनिवाडा करणारा एकमेव नि:पक्षपाती न्यायाधीश आहे.
10) आजची काळजी तुम्ही घ्याल तर उद्याची काळजी नक्कीच परमेश्वर घेईल.