प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यास करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही विद्यार्थी तीन तास अभ्यास करतात तरीही त्यांच्या काही लक्षात राहत नाही. काही विद्यार्थी फक्त एक तास अभ्यास करूनही चांगले गुण मिळवितात. असे का होते ? तर हे विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. विद्यार्थी किती वेळ अभ्यास करतात, काय अभ्यास करतात, कसा अभ्यास करतात आणि किती एकाग्रतेने अभ्यास करतात या सर्वच गोष्टींचा विचार करावा लागतो.
पालकांचीही यामध्ये खूप महत्वाची भूमिका असते. पालकांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिला आहे ? विद्यार्थी दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतात का ? विद्यार्थी गृहपाठ सोडून इतर वेळेस पाठांतर आणि इतर अभ्यास करतात का ? या गोष्टी तपासल्या पाहिजेत. अनेक विद्यार्थी 3 तास अभ्यास करतात आणि या 3 तासात ते शाळेत दिलेला गृहपाठ पूर्ण करतात. परंतु इतर पाठांतर आणि गणिताचा सराव ते करीतच नाही.
आज अभ्यास करण्याच्या 10 टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. ज्याने टॉपर होण्यास नक्कीच विद्यार्थ्यांना मदत मिळेल.
1) अभ्यासाची वेळ बदला…
अनेक विद्यार्थी असे आहेत जे चुकीच्या वेळेत अभ्यास करतात. काही विद्यार्थी शाळेतून थकून आले की अभ्यासाला बसतात. ज्यामुळे त्यांचे अभ्यासात अजिबात मन लागत नाही. तर काही विद्यार्थी रात्री झोपेच्या वेळी अभ्यासाला बसतात त्यामुळे अभ्यास पूर्ण होत नाही. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा पहाटेची वेळ ही अभ्यासासाठी अत्यंत उपुक्त मानली जाते. तसेच पहाटेच्या वेळी पाठांतरही खूप छान होते. त्यामुळे अभ्यासाची वेळ बदला आणि पहाटेच्या वेळी अभ्यास करा. टॉपर विद्यार्थी नेहमी पहाटे अभ्यास करतात.
2) सराव करा…
शिक्षक शाळेमध्ये आपल्याला जे काही शिकवतात त्याचा घरी येऊन सराव करने खूप गरजेचे असते. विद्यार्थी शिक्षकांनी एखादा धडा शिकविल्याननंतर पुस्तक बंद करतात आणि थेट परीक्षेच्या अगोदरच उघडतात. त्यामुळे शिक्षकांनी काय शिकवले होते हे त्यांच्या लक्षात राहत नाही. शिक्षकांनी शिकविलेल्या प्रत्येक गोष्टीचा घरी येऊन सराव करा. टॉपर विद्यार्थी नेहमी सराव करतात.
3) अवघड विषय आधी घ्या…
विद्यार्थी जेव्हा अभ्यासाला बसतात तेव्हा पूर्ण उत्साहात असतात. बरेच विद्यार्थी अगोदर सोप्या विषयांचा अभ्यास करतात आणि नंतर अवघड विषय करायला घेतात परंतु तोपर्यंत त्यांना कंटाळा आलेला असतो आणि अवघड विषयांचा अभ्यास तसाच राहून जातो. कधीही अभ्यास करताना अवघड विषय अगोदर घ्या आणि सोपे विषय नंतर. टॉपर विद्यार्थी नेहमी अवघड विषयांचा अभ्यास अगोदर करतात.
4) वेळापत्रक तयार करा…
विद्यार्थ्यांचे अभ्यास करण्यासाठी कोणतेही वेळापत्रक नसते. विद्यार्थी कोणत्याही वेळेत कसाही अभ्यास करतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास पूर्ण होत नाही. एक दिवसभराचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. कोणत्या वेळेत कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा हे ठरवून घ्या. टॉपर विद्यार्थी नेहमी वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करतात.
5) एकाग्र व्हा…
अनेक विद्यार्थ्यांना बरोबर अभ्यासाच्या वेळेत भूक लागते किंवा झोप लागते किंवा ते पूर्ण लक्ष देवून अभ्यास करीत नाहीत. विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा 5 तास टाईमपास करीत अभ्यास करण्यापेक्षा 1 तास एकाग्र होऊन अभ्यास केलेला कधीही बरा. एकाग्र होऊन तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा केलेला सर्व अभ्यास तुमच्या लक्षात राहतो. टॉपर विद्यार्थी नेहमी एकाग्र होऊन अभ्यास करतात.
6) एका वेळी एक विषय…
विद्यार्थी अभ्यास करताना अनेक चुका करतात विद्यार्थी एका वेळेला दोन-तीन विषयांचा अभ्यास करतात त्यामुळे तो पूर्ण एकाग्र होऊन अभ्यास करू शकत नाही म्हणून एका वेळी एकाच विषयाचा अभ्यास करा आणि तो 100% पूर्ण करा. यामुळे तुमचा कोणत्याही विषयाचा अभ्यास अपूर्ण राहणार नाही. टॉपर विद्यार्थी नेहमी एकावेळी एकाच विषयाचा अभ्यास करतात.
7) चुका शोधा…
विद्यार्थी नेहमी कंटाळवाण्या पद्धतीने अभ्यास करतात. आपण केलेल्या अभ्यासात विद्यार्थी काही नवीन शोधतच नाहीत किंवा आपल्याकडून काय चुका झाल्या आहेत याचा ते शोध घेत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चुका तशाच राहून जातात आणि त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होतो. म्हणून नेहमी आपल्याकडून काय चुका होतात याचा शोध घ्या आणि त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. टॉपर विद्यार्थी नेहमी आपल्या चुका शोधतात आणि त दुरुस्त करतात.
8) शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या…
बऱ्याच विद्यार्थ्यांना कसा अभ्यास करायचा आणि काय अभ्यास करायचा हे माहीत नसते अशावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे शिक्षक कसा अभ्यास करायचा आणि काय करायचा याविषयी नक्कीच चांगले मार्गदर्शन करतील. टॉपर विद्यार्थी नेहमी शिक्षकांचे मार्गदर्शन घेतात.
9) पुरेशी झोप गरजेची…
विद्यार्थी काही वेळा प्रमाणापेक्षा जास्त वेळ अभ्यास करतात त्यामुळे खूप जास्त अभ्यास करूनही त्यांचा पूर्ण अभ्यास होत नाही. लक्षात ठेवा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आपली मानसिक स्थिती चांगली असणे गरजेचे आहे आणि मानसिक स्थिती चांगली असण्यासाठी शरीराला पुरेशी झोप मिळणेही आवश्यक आहे त्यामुळे पुरेशी झोप घ्या. टॉपर विद्यार्थी नेहमी पुरेशी झोप घेतात.
10) आनंदी रहा…
अनेक विद्यार्थी पालकांनी अभ्यास सांगितल्यानंतर दुखी होतात परंतु विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा कुठलेही काम तुम्ही आनंदाने करता त्यात तुम्ही नक्की यशस्वी होता त्यामुळे अभ्यास करताना नेहमी आनंदी राहा आणि आनंदाने अभ्यास करा. एक गोष्ट लक्षात ठेवा अभ्यास तर तुम्हाला करावा लागणारच आहे मग तो अभ्यास तुम्ही आनंदाने करायला काय हरकत आहे ? टॉपर विद्यार्थी नेहमी आनंदाने अभ्यास करतात.
अशाच प्रकारची शैक्षणिक माहिती आपल्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. आजची माहिती आपल्याला आवडली असेल तर पुढे विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या माहितीसह धन्यवाद.
👍👌🏻🙏🏻