१) जुलुमाने विचार मरत नसतात, ते सुदृढ केले जातात.
२) जितके निरीक्षण सूक्ष्म, तितकी समजूत अधिक म्हणून जास्त सखोल व अधिक विचार करा.
३) विद्या म्हणजे ज्ञान, जेणेकरून माणूस निर्मळ होतो. विचारही समर्थ होतात.
४) आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असणे तेच खरे शिक्षण.
५) शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान नसून कृती होय.
६) आत्मज्ञान हेच खरे ज्ञान.
७) सदगुण आपोआपच प्रगट होतात.
८) चौकसपणा हा सर्व शिक्षणाचा पाया आहे.
९) जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.
१०) पशुंना द्रव्याची इच्छा नसते ; पण तेच इच्छा मनुष्याला पशु बनविते.