प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना माहिती असावे असे काही जनरल नॉलेजचे प्रश्न आज देत आहोत हे प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहून ठेवायचे आहेत आणि याचे पाठांतर करायचे आहे. या प्रश्नांचा नक्कीच प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना उपयोग होईल ही अपेक्षा.
1) महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर – राहुरी ( अहमदनगर )
2) लेण्याद्री ( पुणे ) येथील अष्टविनायकाचे नाव काय ?
उत्तर- गिरिजात्मक
3) हरिश्चंद्रगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
उत्तर – अहमदनगर
4) दिवसा सागराकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात ?
उत्तर – खारे वारे
5) त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो ?
उत्तर – गोदावरी
6) राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते ?
उत्तर – नागपूर
7) दूरध्वनीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
उत्तर – ग्रॅहम बेल
8) विजेचे मापन कोणत्या उपकरणाने करतात ?
उत्तर – इलेक्ट्रोमीटर
9) कोणत्या वायूला मार्श गॅस असे म्हणतात ?
उत्तर – मिथेन
10) कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना केली ?
उत्तर – रयत शिक्षण संस्था