प्रयत्न जोरदार असतील तर नशिबाला देखील झुकावे लागते.
समृद्धीकडे नेणारा प्रत्येक प्रवास शिक्षणाने सुरू होतो.
संधी निसर्ग प्रत्येकाला देत असतो. फक्त संधीचे सोने करता आले पाहिजे.
नाव ठेवणे सोपे, परंतु नाव कमविणे कठीण.
शिस्त, कार्यक्षमता व तत्परता या तीन गोष्टी वाढल्यानंतरच मनुष्याची कार्यक्षमता वाढते.
हसणारा सर्वांना हसवतो; पण रडणारा एकटाच रडतो.
प्रसंग अनेकांना वळण लावतात, पण प्रसंगाला वळण लावणारा एखादाच जन्मतो.
त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांती शिवाय प्रगती नाही.
व्यक्तिगत चारित्र्यातून राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते.
मनुष्य मोठा विचित्र आहे, तो सुख घटाघटा पितो व दुःख चघळीत बसतो.
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.