जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण यश संपादन केले पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. एखाद्या गोष्टीत हार मिळाली की आपण नाराज होतो किंवा ती गोष्ट सोडून देतो. जिंकणे प्रत्येकाला आवडते परंतु जीवनात प्रत्येक वेळी आपण जिंकुच असे नाही. काहीजण यशस्वी होण्यासाठी साधे प्रयत्नसुद्धा करीत नाहीत. अनेकजण नैराश्यामध्ये जीवन जगतात तर काहींना हार मानण्याची सवयच झालेली असते.
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांसाठी 10 उपाय सांगितले आहेत हे उपाय प्रत्येकाने आचरणात आणावेत आणि याप्रमाणे कृती केली तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
1) नियोजन करा
आपण जे काम हाती घेतले आहे त्याचे परफेक्ट नियोजन करा. आवश्यकता असल्यास एका कागदावर लिहून घ्या. लिहून ठेवल्याने तुमचे काम अर्धवट राहणार नाही.
2) वेळ निश्चित करा
आपण जे काम करणार आहोत त्याची वेळ निश्चित करा म्हणजे सर्व कामे नियोजनानुसार आणि वेळेत पूर्ण होतील.
3) अर्धवट सोडू नका
जे काम हाती घेतले आहे ते कधीही अर्धवट सोडू नका. ते पूर्णच करा.
4) एका वेळी एक काम
अनेक जणांना सवय असते की ते एकच वेळी अनेक कामे करतात. त्यामुळे एकही काम परफेक्ट होत नाही म्हणून एका वेळी एकच काम करा ते पण परफेक्ट करा.
5) 100% द्या
कोणतेही काम करताना स्वतःला त्या कामात पूर्णपणे झोकून द्या. 100% एफर्ट द्या. ते काम पूर्ण झाल्याशिवाय कशाचाही विचार करू नका.
6) थांबू नका
अनेकजण थोडे काम केले तरी शिल्लक काम उद्या करू असे म्हणून थांबतात. आणि उद्या ठरविलेले काम कधी होतंच नाही… म्हणून काम पूर्ण होईपर्यंत थांबू नका.
7) विचार करत बसू नका
अनेक जण एखादे काम हाती घेतल्यानंतर फक्त विचार करत बसतात परंतु प्रत्यक्षात कृती करत नाहीत प्रत्यक्षात कृती करा विचार कमी करा.
8) नेहमी पॉझिटिव्ह रहा
पॉझिटिव्ह राहिल्याने काम करण्यासाठी चांगली ऊर्जा निर्माण होते म्हणून कोणतेही काम करताना पॉझिटिव्ह विचार केल्याने कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण होते.
9) निगेटिव्ह विचारांपासून लांब रहा
कोणतेही काम सुरू करताना जर आपण निगेटिव्ह विचार करत असू तर आपण अर्धी लढाई तिथेच हरलेलो असतो. त्यामुळे निगेटिव्ह विचारांपासून नेहमी लांब रहा.
10) नेहमी खरे बोला
नेहमी खरे बोलल्याने आपल्या मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण किंवा कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. कुठल्याही संकटाचा सामना खोटे बोलून करता येत नाही त्यामुळे प्रत्येक संकटावर खरे बोलून मात करा.
– विकास भारत कोटकर
वरील दहा गोष्टी नक्कीच आपल्याला नक्कीच एक यशस्वी व्यक्ती बनवतील. वरील दहा गोष्टी आपल्या आचरणात आणा आणि दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करा.
आमचा आजचा लेख आपल्याला आवडला असेल तर नक्कीच पुढे शेअर करा.
Khup Chan…..Sundar vichar
Thanks
Nice motivation mi