विद्यार्थ्यांनो आता नापास व्हाल तर त्याच वर्गात बसावे लागेल… 5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या अगोदरच्या निर्णयात बदल करण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. परंतु अनेक शिक्षकांच्या मागणीला यश आले आहे असे सांगण्यात येत आहे. 

शिक्षण हक्क कायदा 2011 काय आहे ?

या कायद्यानुसार 5वी ते 8वी चे विद्यार्थी काही कारणास्तव विषयांमध्ये नापास झाले तरीही त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येत होता. विद्यार्थ्यांना पास करून घेण्यात येत होते. या गोष्टीमुळे शिक्षक नाराज होते. विद्यार्थ्यांनी काहीही अभ्यास न करता ते पास होत आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांचा पाय पक्का नाही ते विद्यार्थी सुद्धा पास होऊन पुढील वर्गात जात आहेत त्यात विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे असे शिक्षकांचे तसेच पालकांचीही म्हणणे होते. काही विद्यार्थी तर असे आहेत ज्यांना लिहिता आणि वाचताही येत नाही तरीदेखील ते पास होतात. या गोष्टीला शिक्षक आणि पालकांचा विरोध होता.

काय आहे शिक्षण हक्क कायदा 2011 मधील बदल ?

आता शिक्षण विभागाने या कायद्यात बदल केला आहे. आता 5वी ते 8वी या वर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा द्यावीच लागणार आहे. जर विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाला तर तो नापास गृहीत धरला जाईल आणि पुढील वर्गात त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. म्हणजे 5वी ते 8वी या विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता बंद होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत नाराजीचे वातावरण आहे. परंतु शिक्षकांनी आणि पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे

नापास झाल्यास पुन्हा संधी मिळेल काय ?

नापास झाल्यास विद्यार्थी निराश होतात खचून जातात. विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाते म्हणून यामागे त्यांना पुढील वर्गात ढकलण्यात येत होते परंतु आता तसे नाही. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की नापास झाल्यावर पुन्हा एक संधी मिळेल का ? तर हो… नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची आणखी एक संधी देण्यात येणार आहे. पण विद्यार्थी जर त्यातही नापास झाला तर मात्र त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गात बसावे लागणार आहे. पुढील वर्गात त्याला प्रवेश देण्यात येणार नाही.

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी काय करावे ?

शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे जे विद्यार्थी अभ्यास करीत नव्हते ते विद्यार्थी खूप चिंतेत आहेत. आता या परिस्थितीत काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तर अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करावा असे उत्तर आता शिक्षक आणि पालकांकडून देण्यात येत आहे. कारण पुन्हा एक वर्ष त्याच वर्गात बसण्यापेक्षा अभ्यास करून पास झालेले कधीही बरे असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

एकंदरीत या निर्णयाने कुठे आनंदाचे वातावरण आहे तर कुठे दुःखाचे. अशाच बातम्या आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group