विद्यार्थी आणि पालकांसाठी जनरल नॉलेज चे प्रश्न उत्तरे देत आहोत. विद्यार्थ्यांनी प्रश्न वहीत लिहून ठेवायचे आहेत आणि पाठांतर करायचे आहे.
1) कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
उत्तर :- पंचगंगा
2) हलेचा धूमकेतू किती वर्षानंतर दिसतो ?
उत्तर :- 76 वर्षानंतर
3) पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वप्रथम कोणी शोधून काढले ?
उत्तर :- कोपर्निकस
4) कोणत्या धातूवर आम्ल आणि अल्कली यांचा काहीच परिणाम होत नाही ?
उत्तर :- सोने
5) असा कोणता पदार्थ आहे जो पदार्थाच्या तिन्ही अवस्थांमध्ये आढळतो ?
उत्तर :- पाणी
6) महाराष्ट्रातील कोणत्या संतांची भारुडे आणि गवळणी प्रसिद्ध आहे ?
उत्तर :- संत एकनाथ
7) फ्रिज मधील तापमान थंड ठेवण्यासाठी कोणत्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो ?
उत्तर :- क्लोरोफोरो कार्बन
8) भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करते ?
उत्तर :- भारताचे सर्वोच्च न्यायालय
9) भारतात जहाज बांधणीचा उद्योग प्रामुख्याने कोणत्या बंदरात चालतो ?
उत्तर :- विशाखापट्टणम
10) भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले नैसर्गिक बंदर कोणते ?
उत्तर :- मुंबई
वरील माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की पुढे शेअर करा.