एका रामपूर नावाच्या खेडेगावांमध्ये एक शिल्पकार रहात होता. तो देवदेवतांच्या सुंदर अशा मूर्ती घडवण्याचे काम करत असे. एकदा त्याला शहरातील श्रीमंत घरातून मूर्ती बनवण्याचे काम मिळाले. त्याने सुंदर अशी देवीची मूर्ती तयार केली. एके दिवशी ती बनवलेली देवीची मूर्ती त्याच्या गाढवावर ठेवून शहराकडे घेऊन निघाला.
रस्त्यावरून जाताना खूप गर्दी होती, आजूबजूच्या गावातील लोकं त्या मूर्तीचे कौतुक करू लागले. काहींनी स्तुती केली. काही लोक त्या देवीचे दर्शन घेऊ लागले तर कुणी नतमस्तक झाले. परंतु मूर्ख गाढवाला वाटले की लोक त्याच्या पुढेच नतमस्तक होत आहे आणि त्याचेच कौतुक करत आहे.
हे सर्व बघून गाढव रस्त्याच्या मध्यभागी थांबले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले. त्या शिल्पकाराने गाढवाला शांत शब्दांमध्ये समजून सांगितले तरीही गाढव ऐकायला तयार नव्हते. गाढव जागेवरून काही हालेना. शेवटी त्या शिल्पकाराने वैतागून गाढवाला काठीने मारले. तेव्हा ते गाढव शुद्धीवर आले आणि नम्रपणे चालू लागले. अशाप्रकारे त्या शिल्पकाराने देवीची मूर्ती मूर्ती शहरांमध्ये पोहोचवली.
तात्पर्य : चुक झाल्यावर वेळेवर केलेली शिक्षा फलदायी आहे
मित्रांनो वरील माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की पुढे शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच माहितीसह…