या जगात अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतात पण अनेक गोष्टी अशाही आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत. आजच्या लेखात आपण अशाच काही मजेशीर गोष्टींबद्दल माहिती करून घेणार आहोत ज्याबद्दल कदाचित आपल्याला माहिती नसेल.
1) आपण कुत्रा पाळतो तर काही जणांना कुत्रा हा प्राणी अजिबात आवडत नाही. पण आपल्याला हे माहीत आहे का की पॅरिस मद्ये माणसांपेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त आहे.
2) आपण सर्वजण आपले दोन्ही डोळे बंद करून झोपतो. परंतु डॉल्फिन मासा आपला एक डोळा उघडा ठेऊन झोपू शकतो.
3) इंग्रजी मद्ये E हे अक्षर सर्वात जास्त वापरले जाते.
4) मनुष्याच्या शरीरात सर्वात लहान हाड हे त्याचा कानामध्ये असते.
5) एक व्यक्ती दिवसभरात एवढ्या वेळा डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप करतो की त्याचा टाईम जर मोजला तर तो अर्धा तास झोप घेण्याबरोर आहे.
6) आज आपल्या प्रत्येकाजवळ आधारकार्ड आहे. त्याचा वापरही आपण नियमित करतो. पण आपल्याला भारतातील पहिले आधारकार्ड कुणाचे होते हे माहिती आहे का ? तर भारतातील पहिले आधार कार्ड एक मराठी महिला रंजना सोनावणे हीचे होते.
7) आज टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे की लोक आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून सुंदर दिसतात. तसेच प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी दुसऱ्या देशामध्ये जातात. परंतु आपल्याला हे माहिती नसेल की प्लास्टिक सर्जरीचा शोध भारतात लागला.
8) आपण सर्वच अगदी सहज फोटो काढू शकतो. प्रत्येकाजवळ मोबाईल असतो त्यामुळे फोटो काढणे अगदी काही सेकंदात शक्य होते. परंतु जुन्या काळात फोटो काढणे सहज शक्य होते का ? तर नाही कारण जगातील पहिला कॅमेरा जेव्हा शोधला गेला तेव्हा त्यात फोटो काढण्यासाठी त्यासमोर 8 तास बसावे लागत होते.
9) आपण ओरडलो की आपला आवाज किती लांब जाऊ शकतो ? काही मीटर लांबपर्यंत जाईल कदाचित. परंतु सिंहाची गर्जना 8 किलोमिटर पर्यंत ऐकू येते असे म्हणतात.
10) आपण सर्वजण कोका कोला अगदी आवडीने पितो. काहीजण स्टाईल म्हणून कोका कोला पितात. प्रत्येक दुकानामध्ये कोका कोला अगदी सहज मिळते. पण आपल्याला हे माहिती आहे का की या कोल्ड ड्रिंक्स आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत. म्हणून क्युबा आणि उत्तर कोरिया सारख्या देशात अशा कोल्ड ड्रिंक्सवर बंदी घालण्यात आली आहे.
Hi