रहस्य एलियन्सचे भाग – 1

पृथ्वीवर किंवा अवकाशात खरंच एलियन आहेत का ?

जर ते असतील तर ते कोठे राहतात ?

ते आपल्याला दिसत का नाहीत ?

एलियन मानवापेक्षा हुशार असतील का ?

असे अनेक प्रश्न प्रत्येकाला रोज पडतात. परंतु हे एलियन खरंच असतात का ? तर याचे उत्तर हो असे आहे.

नुकत्याच अमेरिकेतील एका सैन्याच्या अधिकाऱ्याने याबाबतीत एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की एलियनचे अस्तित्व पृथ्वीवर खूप जुन्या काळापासून आहे. एलियन्स अगदी सहजपणे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर ये जा करू शकतात. तसेच एलियन्स मानवासोबत संवादही साधतात. पुढे बोलताना ते म्हणाले की अमेरिकेच्या सेक्टर 57 मद्ये एलियन्सचे अस्तित्व आहे.

काय आहे सेक्टर 57 ?

सेक्टर 57 ही अमेरिकेतील अशी गुप्त जागा आहे की जीच्याबद्दल फक्त तेथील सरकार आणि सैन्यालाच माहिती आहे. अनेक लोक या जागेला फक्त काल्पनिक मानतात तर काही लोकांच्या मते ही जागा खरंच अस्तित्वात आहे. या ठिकाणी अनेक सिक्रेट मिशन पूर्ण केले जातात व येथील माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. असे म्हटले जाते की याठिकाणी एलियन येऊन मानवाशी संवाद साधतात. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी एलियन्सची कोणतीही माहिती कुणालाही सांगितली जात नाही.

एलियन्सची टेक्नॉलॉजी मानवापेक्षा एडव्हांस आहे का ?

पृथ्वीवर काही घटना अश्या घडल्या आहेत की ज्यामुळे हे समजण्यास नक्की मदत होते की एलियन्सची टेक्नॉलॉजी मानवापेक्षा एडव्हान्स आहे. उदा. उडत्या तबकड्या दिसणे, पृथ्वीवर रहस्यमयी एलियन दिसणे आणि लगेच गायब होणे, एलियनने मानवाचे अपहरण करणे आणि सोडून दिल्यानंतर त्याला काहीच न आठवणे. अश्या अनेक प्रकारच्या घटना लोकांनी अनुभवल्या आहेत आणि त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या पण आहेत. यावरून तर असेच सिद्ध होते की एलियन्सचे अस्तित्व कुठे ना कुठेतरी नक्की आहे…

एलियन्सच्या काही घटना आम्ही पुढील भागात प्रकाशित करू. आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.

5 Comments

Leave a Reply to Parimal Yogesh dhande Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group