प्रेरणादायी सुविचार – 2

1) माणसाचे श्रेष्ठत्व हे त्याच्या जन्मावरून ठरत नसून ते त्याच्या गुणांवरून ठरते.

2) विश्व हे विद्यालय अन् खरा अनुभव हे शिक्षण.

3) मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनीच मनुष्य अधिक शोभून दिसतो.

4) आराम हराम है !

5) व्यक्तिमत्त्वाचा विकास हा शिक्षणाचा प्रमुख उद्देश होय.

6) मनुष्य वाचनाने पोपट बनतो पण अनुभवाने तो गरुड बनतो.

7) जर विज्ञानावर शहाणपणाचे नियंत्रण नसेल तर ते भ्रमिष्टपणाने वागेल.

8) खरा धर्म श्रमाला उत्तेजन देणे होय.

9) नराचे वानर न होता नारायण होण्याची खटपट करावी हा खरा पुरुषार्थ आहे.

10) नेहमी हसत जगा कारण आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा कधी नाही लागणार.

आजचे सुविचार आपल्याला आवडले असतील तर पुढे शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group