क्रिकेट विषयी मनोरंजक माहिती…

मित्रांनो क्रिकेट खेळायला सर्वांना आवडते आणि क्रिकेट विषयी माहिती तर प्रत्येकाला असतेच परंतु आजच्या या लेखात आम्ही आपल्या सोबत अशी माहिती शेअर करणार आहोत कदाचित ही माहिती प्रत्येकाला नसेल.

आजचा आमचा लेख खास क्रिकेट प्रेमींसाठी असणार आहे. आजचा लेक वाचून सर्वच क्रिकेट प्रेमींच्या ज्ञानामध्ये आणखी भर पडेल ही अपेक्षा…

1) 60 षटके ५० षटके आणि 20 षटकांच्या झालेल्या विश्व कप स्पर्धेमध्ये भारत हा एकमेव असा देश आहे ज्याने तीनही विश्व कप जिंकले आहेत. इतर कोणत्याही देशाला ही कामगिरी करता आलेली नाही.

2) एका खेळाडूला एका संघाकडून खेळता येते ही माहिती आपल्याला आहे परंतु एक खेळाडू असाही आहे जो दोन संघांकडून खेळलेला आहे. सैफ अली खान यांचे आजोबा इफ्ताहर अली खान हे भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या संघाकडून क्रिकेट खेळले आहेत.

3) क्रिकेटमध्ये षटकार मारणारे खेळाडू बरेच असतात परंतु आपल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार मारणारे खेळाडू खूप कमी असतात. वेस्टइंडीज टीमचा खेळाडू क्रिस गेल याने कसोटी सामन्यात पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता असे करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

4) आपल्या कारकिर्दीत पहिल्याच सामन्यात पहिल्याच बॉलवर विकेट्स घेणारे खेळाडूही खूप कमी आहेत पाकिस्तानचा इंजमाम उलहक हाही त्यापैकी एक आहे त्याने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यात पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती.

5) क्रिकेटमध्ये सामनाविराचे पुरस्कार अनेक खेळाडूंना मिळालेले आहेत परंतु आपल्याला ही माहिती आहे का की सलग चार सामन्यांमध्ये चार वेळा सामनाविराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? तर हा मान भारतीय खेळाडू सौरभ गांगुली याला मिळाला आहे.

6) क्रिकेट सामन्यांमध्ये थर्ड अंपायर अनेक निर्णय देत असतात. अनेक खेळाडूंना थर्ड अंपायरच्या निर्णयानुसार आऊटही दिले जाते परंतु आपल्याला ही माहिती आहे का जगातील थर्ड अंपायरने आऊट दिलेला पहिला प्लेअर कोण होता ? तर थर्ड अंपायरने आऊट दिलेला जगातील पहिला प्लेयर सचिन रमेश तेंडुलकर हा होता.

7) आपल्याला माहिती आहे का क्रिकेटचा पहिला एकदिवसीय सामना कोणत्या दोन संघ दरम्यान खेळला गेला ? पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघादरम्यान खेळला गेला होता.

8) आपल्या संपूर्ण क्रिकेटच्या कारकिर्दीत फक्त सहा षटकार मारणारा खेळाडू डॉन ब्रॅडमन हा होता.

9) आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 100 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारा वी वी एस लक्ष्मण हा खेळाडू कधीही विश्वचषक स्पर्धेत खेळला नाही.

10) क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांत दरम्यान खेळला गेला.

मित्रांनो आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच पुढे शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group