आपल्या आयुष्यात प्रत्येकजण यश मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. त्यासाठी प्रत्येकजण धावपळ करीत आहे. या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला यश मिळेलच असे नाही. इच्छित गोष्टींमध्ये यश मिळाले नाही की आपण नाराज होतो, प्रयत्न करणे सोडून देतो. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही हरले आहात त्यावेळी आमचे हे प्रेरणादायी सुविचार नक्की वाचा. तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल.
1) लक्षात ठेवा आपण निश्चित केलेले ध्येय आपल्याला एका दिवसात कधीही मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागतात.
2) संयम हा यशस्वी होण्याचा गुरुमंत्र आहे. संयम ठेवा तुम्ही नक्की यशस्वी होणार.
3) तुम्ही आज यशस्वी नाहीत तर तुम्हाला बोलणारे आणि नावे ठेवणारे अनेक जण असतील, परंतु ज्या दिवशी तुम्ही यशस्वी होताल त्या दिवशी हेच लोक तुमच्या आजूबाजूला फिरतील.
4) एखाद्या कामात यश मिळत नाही म्हणून थांबू नका, निराश होऊ नका, प्रयत्न करा पुन्हा प्रयत्न करा आणि पाहा यश तुमच्या पायाशी लोळण घालेल.
5) तुमच्या जीवनात एकच व्यक्ती तुम्हाला यशस्वी बनवू शकतो, तो म्हणजे तुम्ही स्वतः
6) जेव्हा जेव्हा निराश होताल तेव्हा आरशात जाऊन स्वतःला पहा, तुम्हाला भविष्यातील सर्वात यशस्वी व्यक्ती दिसेल.
7) कोणत्याही कामाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा, त्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची नवी ऊर्जा निर्माण होईल.
8) एखादे कार्य करायचे असेल तर मनातून ठाम रहा, कारण मनातून हारलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.
9) तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आतापासूनच यशस्वी लोकांच्या संगतीत रहा.
10) लक्षात ठेवा ध्येय मिळविण्यासाठी कोणतेही ठराविक वय नसते, तुम्ही आताही सुरुवात करू शकता.
– विकास भारत कोटकर.
Hi