विद्यार्थ्यांनो संगत ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला खूप पुढे घेऊन जाते किंवा खूप पाठीमागे घेऊन येते. त्यामुळे असे म्हटले जाते की आपली संगत नेहमी चांगल्या व्यक्तीसोबतच असावी. एका चांगल्या व्यक्तीची संगत आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते. चांगल्या व्यक्तीच्या संगतीमुळे एक हारलेला व्यक्ती सुद्धा पुन्हा जिंकू शकतो. त्यामुळे आपली संगत निवडताना विचारपूर्वक निवडावी.
आज आम्ही आपल्याला तीन नापास झालेल्या मुलांची एक बोधकथा सांगणार आहोत या बोधकथेमध्ये कशाप्रकारे एक चांगली संगत विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकते हे सांगण्यात आले आहे. आजची बोधकथा वाचून विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा नक्की प्रेरणा मिळेल.
राहुल, राजू, नितीन हे तीन मित्र असतात हे तीनही मित्र एकाच शाळेतील एका वर्गामध्ये शिकत असतात. तिघेही खूप खोडकर असतात. तिघेही वर्गात शिक्षकांनी दिलेला अभ्यास कधीही पूर्ण करत नसत. तसेच प्रत्येक परीक्षेमध्ये तिघेही सतत नापास व्हायचे परंतु त्याने त्यांना काहीही फरक पडत नव्हता. तिघांचेही पालक आणि शिक्षक त्यांना सांगून वैतागले होते. त्यांच्यासमोर त्यांच्या आयुष्यात काहीच ध्येय नव्हते. शाळेत जायचे टवाळक्या करायच्या मस्ती करायची इतर विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा हेच त्यांचे आयुष्य होते. तिघेही मिळून वर्गातील मुलींना सुद्धा त्रास द्यायचे मुलींचे डबे मधल्या सुट्टीमध्ये चोरून खायचे. त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्यासोबत कोणीही मैत्री करायला तयार होत नव्हते.
त्यावर्षी शाळेमध्ये अंकुश नावाचा एक मुलगा नवीनच ऍडमिशन घेऊन आला होता. त्याला इतर विद्यार्थ्यांबद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे त्याची ओळख या तिघांसोबत झाली आणि अंकुश त्या तिघांचा चांगला मित्र बनला. अंकुश अभ्यासात खूपच हुशार होता शाळेत शिक्षकांनी दिलेला सर्व अभ्यास तू वेळेवर पूर्ण करायचा तसेच तो खोडकर नव्हता तो शिस्तीचे पालन करायचा तो खूप शिस्तप्रिय होता. शाळेतील शिक्षकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी अंकुशला सांगितले की तू या तिघांसोबत राहत जाऊ नकोस ते खूप खोडकर आहेत ते सर्वांना त्रास देतात आणि अभ्यासातही हुशार नाहीत म्हणून तू त्यांची संगत सोडून दे परंतु अंकुश म्हणाला ते तर आता माझे मित्र झाले आहेत मी त्यांना कसा सोडू ?
या तिघांचा तर अंकुश वर काही परिणाम झाला नाही परंतु अंकुशचा परिणाम मात्र या तिघांवर हळूहळू व्हायला लागला होता. जेव्हा येते की मस्ती करत असतात तेव्हा अंकुश वही आणि पुस्तक घेऊन अभ्यास करत असायचा अंकुश ला अभ्यास करताना पाहून भीती गेली वही आणि पुस्तक घेऊन अभ्यास करू लागले. जेव्हा हे तिघे खोडकरपणा करायचे तेव्हा अंकुश त्या ठिकाणावरून निघून जायचा आपल्या मित्राला हे आवडत नाही याची जाणीव या तिघांना झाली त्यामुळे त्यांनी खोडकरपणा करायचे सोडून दिला. आपलाच मित्र आपल्या सोबत राहून शिक्षकांनी दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करतो तर आपण का नाही करू शकत याची जाणीव या तिघांना व्हायला लागली आणि हे तिघेही नियमितपणे शिक्षकांनी दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करू लागले.
त्यांच्यात झालेला हा अमुलाग्र बदल सर्वांना स्पष्टपणे दिसत होता अंकुशही आपल्या मित्रांना अभ्यासात मदत करू लागला चांगले मार्क्स कसे मिळवायचे याचेही मार्गदर्शन व आपल्या मित्रांना करू लागला. अंकुश तर प्रत्येक परीक्षेमध्ये टॉपर होताच परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की हे तिघेही प्रत्येक परीक्षेमध्ये नापास व्हायचे परंतु हे तिघेही आता प्रत्येक परीक्षेमध्ये पास व्हायला लागले होते. ज्या गोष्टी पालकांच्या आणि शिक्षकांच्या रागावण्याने ही शक्य झाल्या नव्हत्या त्या फक्त अंकुशच्या संगतीमुळे शक्य झाल्या होत्या. अंकुश नेहमी प्रथम क्रमांक मिळवितो परंतु आपण फक्त पास होतो याची खदखद या तिघांनाही हळूहळू जाणवायला लागली आणि तिघांनीही जोरदार अभ्यासाला सुरुवात केली. आणि हे तीनही विद्यार्थी वर्गातील टॉपर बनले.
पुढे जाऊन अंकुश डॉक्टर बनला राजू मोठा वकील झाला नितीन इंजिनियर झाला आणि राहुल मोठा पोलीस अधिकारी झाला. हे सर्व शक्य झाले एकट्या अंकुशच्या संगतीमुळे जर अंकुश यांच्या संगतीमध्ये आला नसता तर हे तिघेही एकमेकांच्या संगतीमध्ये अजून जास्त बिघडत गेले असते आणि त्यांचे कुठलेही भविष्य नसते.
तात्पर्य : एक चांगली संगत नेहमी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाते आणि एक वाईट संगत नेहमी आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर ठेवते त्यामुळे संगत नेहमी चांगल्या व्यक्तींसोबत करा.