१) अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
२) भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापत कधीही भरत नाही.
३) कधीही प्रयत्न करणे सोडू नका कारण सुरुवात नेहमी कठीण असते.
४) आपल्या आयुष्यात सगळं गमावलं तरी काही हरकत नाही फक्त स्वतःवरच आत्मविश्वास गमावला नाही पाहिजे.
५) अपयशाने खचून न जाता नव्या जिद्दीने नवीन सुरुवात करावी.
६) सर्व काही हवं तसं मिळेलच असं नाही, आयुष्यात कुठेतरी तडजोड करावी लागते.
७) हक्काने मन मोकळ करता येईल असे मित्र आयुष्यात भेटले तर जगण्यातील रंगत वाढत जाते.
८) विरोध, राग, बदनामी आणि चर्चा झाल्याशिवाय विजेता घडत नाही.
९) राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
१०) समाधानातच खरे सुख आहे हे ज्याला समजले तोच जीवनातील खरा सुखी व्यक्ती आहे.
अशाच शैक्षणिक अपडेट आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा.