मित्रांनो विज्ञानाने खूप जास्त प्रगती केली आहे आज मानव चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. तसेच मानव मंगळ ग्रहावर घर बांधण्याचे स्वप्नही पाहत आहे, आणि त्या दिशेने मानवाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु खरंच आपले विज्ञान एवढे प्रगत आहे का ? जगातील सर्वच गोष्टी आपल्याला माहित आहेत का ? वाचूया अशाच काही रहस्यमय गोष्टींबद्दल की ज्याची उत्तरे आपल्या विज्ञानाजवळ सुद्धा नाहीत.
1) आपल्या शास्त्रज्ञांनी जुन्या काळामध्ये डायनासोर होते हे तर शोधले परंतु डायनासोरचा रंग कोणता होता हे आजही आपल्या शास्त्रज्ञांना शोधता आले नाही.
2) आपल्या पृथ्वीवरील एका वर्षापेक्षा जास्त कालावधी म्हणजे शुक्र ग्रहावरील एक दिवस होय.
3) कोणत्याही वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या उलट दिशेने वाहत असताना हवेचा आवाज येतो, परंतु त्याच वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या दिशेने हवा वाहत असल्यास हवेचा आवाज येत नाही.
4) मनुष्याची कवटी 29 वेगवेगळ्या हाडांपासून तयार झालेली असते. मनुष्याची हाडे सिमेंट पेक्षाही पाच पट अधिक कडक असतात.
5) मानवाच्या शरीरात प्रत्येक सेकंदाला कितीतरी कोटी सेल्स तयार होतात आणि नष्ट होतात.
6) आपल्या आजूबाजूला अनेक बॅक्टेरिया असतात हे तर आपल्याला माहितच आहे, परंतु आपल्याला कदाचित हे माहिती नसेल की आपल्या स्किनच्या एक इंच भागात जवळपास दोन कोटी बॅक्टेरिया असतात. परंतु सर्वच बॅक्टेरिया घातक नसतात काही बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी चांगलेही असतात.
7) सर्वसामान्य मोबाईलचा कॅमेरा दोन ते 42 मेगापिक्सल असतो, परंतु आपल्याला हे माहिती आहे का आपले डोळे 576 मेगापिक्सल असतात आणि ते जवळपास एक कोटी रंग ओळखू शकतात.
8) डोळे उघडे ठेवून कुठलाही मनुष्य शिंकु शकत नाही शिंकताना प्रत्येक मनुष्याचे डोळे बंद होतात.
9) आपल्या शरीरात सतत रक्त वाहत असते हे तर सर्वांनाच माहिती आहे परंतु कदाचित आपल्याला ही माहिती नसेल की आपल्या शरीरात दिवसभरात रक्त साधारणता नऊ हजार किलोमीटरच्या टप्पा पूर्ण करते.
10) सध्या जगात सर्वात शक्तिशाली कोणती गोष्ट असेल तर ती आहे मानवी मेंदू.