विद्यार्थ्यांनो बोधकथा विविध प्रकारच्या असतात आणि या बोधकथा आपल्याला खूप काही शिकवून जातात. अशीच आजची बोधकथा आपल्याला सांगणार आहे की तुम्ही कितीही बलवान असलात तरीही संकटात नेहमी शक्तीचा वापर करण्यापेक्षा युक्तीचा वापर केल्याने आपला फायदा होतो.
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध चालू झाले की या पृथ्वीवर कोण श्रेष्ठ ??? देव म्हणायचे आम्ही श्रेष्ठ तर राक्षस म्हणायचे आम्ही श्रेष्ठ. शेवटी सर्वांनी ब्रह्मदेवाकडे जायचे ठरवले. एक दिवस सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारले की या पृथ्वीवर सर्वात श्रेष्ठ कोण आहे. देव म्हणायचे आम्ही श्रेष्ठ तर राक्षस म्हणायचे आम्ही श्रेष्ठ . शेवटी ब्रह्मदेव ही पेचात पडले. देवांना श्रेष्ठ बोललं तर राक्षसांना राग येणार, अन अन् राक्षसांना श्रेष्ठ बोललं तर देवांना राग येणार. यातच ब्रह्मदेवांना एक युक्ती सुचली. त्यांनी देवांना आणि राक्षसांना उद्या आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले.
दुसरा दिवस उजाडला. देव आणि राक्षस दोघेही ब्रह्मदेवाच्या घरी जेवणासाठी गेले. ब्रह्मदेवाने त्यांच्या जेवणाची साग्रसंगीत व्यवस्था केलेली होती. ब्रह्मदेवाने त्यांना विचारले की पहिल्यांदा जेवणासाठी कोण बसणार. शेवटी राक्षसच ते… ते म्हटले पहिल्यांदा आम्ही जेवण करणार…. हजारोंनी आलेले राक्षस ब्रह्मदेवाच्या घरी पंगत धरून जेवणासाठी बसले. सर्वांना जेवण वाढण्यात आले. पण जेवण करताना एक नियम होता. कोणीही हात न दुमडता जेवण करायचे. सर्व राक्षसांनी नियम समजून घेतला आणि जेवायला चालू केले. पण कुणाच्याही तोंडामध्ये घास पोहोचत नव्हता. सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करू लागले. कुणी जेवण वरती फेकून तोंडात झेलण्याचा प्रयत्न करत असत ….. परंतु सर्वांचे सर्व प्रयत्न असफल झाले. कोणाचेही पोटभर जेवण झाले नाही.
आता दुसरी पंगत देवांची बसणार होती. सर्व देव जेवणासाठी मध्ये बसले. सर्वांना जेवण वाढण्यात आले. जो नियम राक्षसांना होता तोच नियम देवांनाही होता की हात न दुमडता जेवण करणे. सर्व देवांनी जेवणाच्या अगोदर श्लोक म्हटले आणि जेवयला बसले. आता देवांनी एक युक्ती केली होती. समोरच्याच्या ताटातले अन्न समोरच्यालाच खाऊ घालू लागले. यामुळे काय झाले हात न दुमडता ही प्रत्येकाची जेवण होत होते. अशाप्रकारे कोणतीही गर्दी गोंधळ न करता देवांनी शांतते मध्ये पोटभर जेवण केले.
आता सर्व निकाल सर्वांसमोर होता. ब्रह्मदेवाने सर्वांना सांगितले यावरून असे स्पष्ट होते की देव श्रेष्ठ आहे.
तात्पर्य :- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.