श्रीमंत होण्याचे 10 रहस्य…

जीवनात प्रत्येकाला वाटते आपण श्रीमंत व्हावे. आपल्याकडे खूप पैसा असावा, आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. परंतु सर्वांच्याच इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा सर्वजणच श्रीमंत होतात असेही नाही याला कारणीभूत असतात आपल्या काही सवयी.

आपण गरीब म्हणून जन्माला आलो ही आपली चूक नाही परंतु आपण गरीब म्हणूनच मेलो तर नक्कीच ही आपली चूक आहे. श्रीमंत प्रत्येकजण बनु शकतो. या लेखात आम्ही श्रीमंत बनण्यासाठी दहा रहस्य दिले आहेत तुम्ही सर्वजण नक्कीच हे रहस्य आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न कराल ही अपेक्षा…

 

1) खर्च लिहून ठेवणे

– बरेच जण पैसे तर कमवतात परंतु ते पैसे कुठे खर्च होतात आणि कसे खर्च होतात याची त्यांना अजिबात कल्पना नसते. आपल्या जवळ असलेले पैसे नेमके कुठे खर्च होतात आणि कशासाठी खर्च होतात याची दररोज नोंद करून ठेवा म्हणजे तुम्हाला पैशांचे नियोजन करणे सोपे होईल. श्रीमंत लोक आपल्या खर्चाच्या नोंदी ठेवतात.

2) बचत करने

– बरेच जण आपल्याजवळ आलेले सर्वच्या सर्व पैसे खर्च करून टाकतात आणि नंतर त्यांच्या हातात काही शिल्लक राहत नाही पैशांचे व्यवस्थित नियोजन करा आणि पैशांची प्रत्येक महिन्याला थोडी थोडी बचत करा. श्रीमंत लोक नियमित बचत करतात.

3) अनावश्यक खर्च टाळने

एखादी गोष्ट आवडली की लगेच ती खरेदी करायची भलेही तिची गरज नसेल. बाहेर एखादा पदार्थ आवडत असला की तो भूक नसतानाही खाणे आणि विनाकारण खर्च करणे, अशा प्रकारच्या चुका टाळा. श्रीमंत लोक अनावश्यक खर्च करत नाहीत.

4) ध्येय निश्चित करने

आपण नोकरी करून श्रीमंत होणार की व्यवसाय करून श्रीमंत होणार याचे एक ध्येय निश्चित करा. ध्येयनिश्चित झाले की त्या ध्येयासाठी स्वतःला झोकून द्या आणि जोपर्यंत श्रीमंत होत नाही तोपर्यंत थांबू नका. श्रीमंत लोक ध्येय मिळवण्यासाठी खूप कष्ट करतात.

5) वेळेत कामे पूर्ण करने

आपली सर्व कामे वेळेत किंवा वेळेआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कुठलेही काम करताना आळस करू नका किंवा आळस आला आहे म्हणून आपली कामे पुढे ढकलू नका. श्रीमंत लोक आपली कामे वेळेत पूर्ण करतात.

6) उत्पन्नाची साधने तयार करणे

काही लोक फक्त नोकरी करतात किंवा काही लोक फक्त व्यवसाय करतात. परंतु सर्व दिवस सारखेच असतील असे नाही. त्यामुळे उत्पन्नाची वेगवेगळे साधने तयार करा वेगवेगळ्या मार्गाने पैसे कशाप्रकारे येतील याचा विचार करा. श्रीमंत लोकांजवळ पैसे येण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग असतात.

7) कर्जातून मुक्त होणे

एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुमच्यावर कोणतेही कर्ज आहे तोपर्यंत तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वात अगोदर आपल्यावर जे कर्ज आहेत ते कमी करण्याचा आणि त्या कर्जातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा कारण कर्जातून मुक्त झाल्यानंतरच तुम्ही बचत करू शकता आणि श्रीमंत होऊ शकता. श्रीमंत लोक स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कधीही कर्ज घेत नाही तर ते आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज घेतात.

8) गुंतवणूक करणे

आपण जर पैशांची बचत करत असाल तर ते पैसे घरात ठेवू नका तर त्या पैशांची गुंतवणूक करा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केल्याने पैशांमध्ये वाढ होत जाते. श्रीमंत लोक पैशांची वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात.

9) पैशांचे नियोजन करने

समजा तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत तर सर्वच्या सर्व एक लाख रुपये व्यवसायामध्ये गुंतवू नका. त्यातील 50 हजार रुपये व्यवसायामध्ये गुंतवा आणि 50 हजार रुपये तुमच्या जवळ असू द्या. जरी व्यवसाय तोट्यात गेला तरीही पन्नास हजार रुपये तुमच्या पुढील वापरासाठी जवळ शिल्लक राहतील. श्रीमंत लोक पैशांचे नियोजन करतात.

10) रिस्क घेणे

काही लोक फक्त श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत बसतात परंतु त्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत. ते आपल्या सिक्युअर झोन मधून कधीच बाहेर येत नाहीत. रिस्क घेणे म्हणजेच आपल्या सिक्युअर झोन मधून बाहेर येणे आणि काहीतरी वेगळे करून दाखविणे. श्रीमंत लोक नेहमी रिस्क घेतात.

– विकास भारत कोटकर 

 

तर मित्रांनो श्रीमंत व्हायचं असेल तर नक्कीच या दहा रहस्यांचा विचार करा आणि आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group